दरवर्षीप्रमाणे इको-प्रो संस्थेतर्फे यावर्षीसुध्दा येत्या गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याकरीता इको-प्रो ग्रीन गणेशा पर्यावरणपुरक गणेशोत्सव २0१२ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच या अभियानात चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर पोलीस विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इको-प्रो स्कूल क्लबसुध्दा सहभागी झालेले आहेत. या अभियानाचा केंद्रबिंदू हे शाळकरी विद्यार्थी असल्याने जवळपास शहरातील २५ शाळांमधून सदर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यामार्फत त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत व शेजारच्या घरांपर्यंत येणारा गणेशोत्सव पर्यावरणपुरक कसा साजरा करावा? याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमाने पीओपी मूर्तीची स्थापना न करणे, रासायनिक रंगाने रंगविलेल्या मूर्तीची स्थापना न करणे, निर्माल्य संकलन कुंडातच निर्माल्य टाकणे, घरगुती गणेशाचे घरीच विसर्जन करणे आदी बाबीवर अभियानामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. 'ग्रीन गणेशा' अभियानबाबत सांगताना इको-प्रोचे संस्थापक अध्यक्ष म्हणाले, चंद्रपूर शहर हे भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. चंद्रपुरात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सवादरम्यान सुध्दा नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात प्रदूषणात भरच पडत असतो. याबाबत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या उत्सवादरम्यान प्रदूषण कमी करण्याकरीता जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. जनजागृती अभियानासोबत विविध स्पर्धा आणि पुरस्कारसुध्दा घोषित करण्यात आले आहे. यामध्ये ग्रीन गणेशा सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार, ग्रीन गणेशा घरगुती गणेश पुरस्कार, ग्रीन गणेशा पत्रकार पुरस्कार आणि विद्यार्थ्यांकरीता निबंध व चित्रकला पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप राहाणार आहे. पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, प्रज्ञा सराफ, धिरेंद्र मुलकलवार, राहुल विरूटकर यांनी दिली.
|
This entry was posted on 22:19 and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

0 comments: