07:03 | Author: eco-pro

चंद्रपूर पठाणपुरा गेट बाहेरील माना परीसरात काल एका बाईक वर जाणाया परीवारातील ४ वद्गर्ााच्या लहान मुलीस बिबटयाने जखमी केल्याने काल रात्री माना परीसरात नागरीकांनी गर्दी केली होती. माना परीसरात इको-प्रो वन्यजीव संरक्षक दलाने पोहचुन द्राहानिच्चा करण्याचा, काही पगमार्क पाहण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच आढळले नाही. सकाळी या संपुर्ण परीसरात सर्च घेण्यात आल्यानंतर 'तडस' या द्रवान वर्गीय प्राण्याचे पगमॉर्क आढळले, विद्गटापण मिळाली होती. दुपारी माना कोळसा खानीचे मॅनेजर, सब एरीया मॅनेजर यांना आरएफओ बडकेलवार व इको-प्रो बंडु धोतरे यांनी सदर माना परीसरातुन जाणाया रस्त्यावरील बाभळीचे वाढलेली झाडे त्वरीत साफ करण्याकरीता यावेळी सांगण्यात आले. चारवट या गावातील कु. हसरी दिवाकर धोबे (४ वर्द्गो) हीची इको-प्रो च्या वतीने भेट घेण्यात आली. धोबे परीवारची विचारपुस करण्यात येउन घटनेबाबत जाणून घेतले. कु. हसरीच्या जखमांची पाहणी केली. सांयकाळी या परीसरात वन विभागाचे रॅपीड रिस्पॉन्स युनीट चे श्री. बोबडे व इतर यांचे सोबत इको-प्रो चे कार्यकर्ते कॅमेला टॅ्रप लावत असतांना 'तडस' या प्राण्यासोबत आमना-सामना झाल्याने या संपुर्ण प्रकरणात तडस असुन बिबटया नसल्याचे स्पद्गट झाले आहे.
|
This entry was posted on 07:03 and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

0 comments: